राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील २०१८-१९ मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
००००००
