भाईंदर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिरा भायंदर मधील मुन्सिपल शाळेतील मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष लोकार्पण सोहळा ओनलाईन पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मुलींची, महिलांची सुरक्षितता महत्वाची असून मिरा-भायंदर महापालिकेने निर्णय घेवून लगेच अमलबजावणी केल्याबद्दल त्याचं अभिनंदन.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आयुक्त संजय काटकर आणि पोलीस आयुक्त मधुकर पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त संजय काटकर म्हणाले की विद्यार्थ्यांची सुराक्षतेसाठी हे पाऊले उचलले आहे. या कक्षात रोज सकाळी ९ ते ५ नजर ठेवली जाईल.खाजगी शाळांना यात सामावून घेण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे.
०००
