ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
