मुंबई : तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते, माजी आमदार, माजी महापौर स्व. अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या माँ साहेबांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माँ साहेबांच्या अर्थ पुतळ्याला अभिवादन करुन गोर गरीबांना फळ वाटप करण्यात आली.
माँ साहेबांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माँ साहेबांच्या स्मृतीदिन साजरा होत आला ते शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे यांच्या तस्बीरीला पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तर माँ साहेबांच्या पुतळ्याची पुजा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरीबांना फळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे शहरप्रमुख प्रदिप शिंदे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उप जिल्हाप्रमुख महेश्वरी तरे, माजी नगरसेविका विद्या कदम, वृंदावन श्रीरंग विभागाचे विभागप्रमुख मयुर पैलकर, महिला विभागप्रमुख नंदा कोथळे, विभाग समन्वयक योगेश भोईर, विभागप्रमुख हेमचंद राठीवडेकर, विभागप्रमुख भालचंद्र देसाई, उपविभागप्रमुख मनोज पाटील, महिला उप विभागप्रमुख राजश्री सुर्वे, खोपट शाखाप्रमुख राजु महाडीक युवा सेना शाखा अधिकारी सागर माने, शाखाप्रमुख धनंजय येंडे, उप शाखाप्रमुख मंदार घोरपडे, वृंदावन उप शाखाप्रमुख विलास घाग, महिला उप विभाग संघटक अनुराधा चव्हाण, महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे, भुपेंद्र सिंग आठवल, तुकाराम डोंगरे, डॉ. दिपक चांगलानी, बाबु देशमुख, बळीराम दळवी, सुर्यकांत शिंदे, मोहन देशमुख, संजय यादव, संतोष गवई, सुनिल भोईर आदी शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उप संघटक महेश्वरी तरे तसेच आझादनगर शाखेचे शाखाप्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे यांनी केले.
०००००
