मुबंई : जगभरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबर रोजी भव्य ‘पिंक पॉवर रन’ आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुधारेड्डी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती सुधारेड्डी आणि ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू यांनी स्पष्ट केले की, ३,५ आणि १० किमी अशा तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ही स्पर्धा असेल. विविध वयोगटातील लोक या जागरूकता कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या रनमधील सहभागींसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
या रनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रचला जाणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. पूर्णपणे गुलाबी रंगात सजवलेल्या पक्ष्याची विशाल मानवी प्रतिमा तयार करून, या प्रयत्नात सहभागी होणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्वचजण जगाला कर्करोगाविरुद्धच्या लढ्यासाठी आपली एकजूट दाखवतील.
०००००
