मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बस नादुरूस्त असून, या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त बस अनेकदा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये साधरण ५० ते १०० बस ताफ्यात दाखल होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या १५ हजार ८०० बस सध्या धावत आहेत. मात्र, यापैकी अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून, या बसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीने नव्या साध्या डिझेल बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बस ग्रामीण भागातील वाहतुकीच्या दृष्टीने फायद्याच्या ठरतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

एसटी महामंडळ अशोक लेलँड कंपनीकडून स्वमालकीच्या दोन हजार ५०० डिझेलवर धावणाऱ्या बसगाड्या विकत घेणार आहेया बसगाड्यांची मुळ प्रतिकृती तयार झाली आहेतिच्या विविध तपासण्या करून प्रमाणित करण्यात येत आहेततिची अंतिम तपासणी १० सप्टेंबर रोजी कंपनीच्या तिरुचिरापल्ली (तमिळनाडूयेथील कारखान्यात करण्यात येणार आहेऑक्टोबरमध्ये सुमारे ५० ते १०० बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होतीलतरनोव्हेंबरपासून १५० ते ३०० बसगाड्या यायला सुरुवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *