प्रताप सरनाईक यांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडे मागणी

अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत अशी मागणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे.

गेल्या १५ वर्षापासून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमदार असून माझ्या मतदारसंघातील अंदाजे ५० टक्के भाग हा मीरा-भाईंदर क्षेत्रात तर ५० टक्के भाग हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना महानगरपालिकेची घरे देण्यात आली असून १०० हून अधिक पत्रकारांनी घराचा ताबाही घेतलेला आहे. तश्याच पध्दतीची योजना मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही लागू करावी, अशी विनंती अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्याकडे, माझ्याकडे तसेच आयुक्त या नात्याने आपल्याकडेही केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काही इमारतींमध्ये शासकिय कोट्यानुसार महानगरपालिकेला घरे मिळणार असून त्यापैकी ५० टक्के घरे पत्रकारांना व ५० टक्के घरे ही विस्थापितांना देण्यासाठी मी आपणाकडे विनंती केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यानुसार आपण सदरची घरे ही पत्रकारांना देण्यासंदर्भात शासनाकडून अभिप्राय मागवून ही घरे ठाणे शहराच्या धर्तीवर पत्रकारांना वितरीत करावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *