मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला दिला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे  सांगितले.

२५ मतदारसंघ असे आहेत की जिथे अजित पवार गटाला महायुतीत उमेदवारी दिली तर भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते किंवा भाजपला उमेदवारी दिली तर अजित पवार गटात बंड होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुंबईत सोमवारी चर्चा करताना या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढतींचा प्रस्ताव दिला. अर्थात या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी लढावे असा हा प्रस्ताव असल्याची चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *