मुंबई : कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते या मुंबई हि कोणाची हो… तर मुंबई हि कष्टकऱ्यांची ,इथे प्रामाणिक पणे राबणाऱ्या हातांची …मुंबईला आपलं म्हणणाऱ्यांची बरेच दा मुंबई फिरत असतांना आपल्याला BMC निळ्या च्या निळ्या पाट्या दिसतात , इतरांच्या साठी एक लॅन्ड मार्क पलीकडे काहीच नाही पण या अश्या अनेका निळ्या नावांचे योगदान मुंबईच्या जडणघडणीत आहे.
सांगायचेच झाले मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकर शेठ हे प्रथम स्थानी असतील …मुंबईच्या ओंजळीत जमिनी देणारे दानशूर भागोजी किर आहेत…संयुक्त महाराष्टाची आहुती देणारे भास्कर कामतेकर आहे ..
आपल्या लेखणीने एक क्रांती घडवून आणणारे अत्रे .नमः जोशी सारखे नेते आहेत ..हि यादी खरच मोठी आहे .तसेच मुंबईच मूळ पुरुष असलेले कोळ बांधव , मुंबईकरांचे पॉट वेळेवर भरणारे डब्बेवाले , रेल्वे जवळचे बूटपॉलिशवाले ,धोबीघाटातील कामगार वर्ग , मुंबईची गटारवाहिनी गटारस्वच्छ ठेवणारे आपले बांधव..
उंच इमारतीच्या पायथ्याला विटा वाहून नेणाऱ्या महिला , दादरच्या फुलमार्केटला पाहटे ताजे ताजे फुल देणारे आपली माणसे असे म्हणतात ना मुंबईला आपले म्हटलं कि मुंबई तुम्हाला आपलेसे करते याच मुंबईचा गाभा असलेला हा कामगार वर्ग कायमच दुर्लक्षित राहिला याच वर्गाची उजाळणी म्हणून आम्ही गणरायाच्या सोबतीने त्यांना एक प्रामणिकी वंदना देतोय …त्यांच्या ‘ कष्टाचे फळ . त्यांना मिळावे हीच आमची या गणराया चरणी प्रार्थना.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *