नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व उत्पन्न गटातील ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम मोदींच्या कॅबिनेटने याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. ते आता मोदींकडून पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

आता भारतातील ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत (आरोग्य विमा योजना) अंतर्गत लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी  ही माहिती दिली. ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील, असेही त्यांनी सायंकाळी उशिरा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगण्यात आले आहे. तर याचा फायदा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि साडे चार कोटी कुटुंबांना होणार आहे. या योजनेंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी ५ लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे.

केंद्राच्या नव्या निर्णयानुसार, ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *