आत्रामांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने ‘दादां’ना मोठा धक्का दिला आहे. भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ, असा पवित्रा धर्मरावबाबांनी घेतला होती. मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केले आहे. त्यामुळे बापलेक आमनेसामने आले आहेत…तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडिल धर्मरावबाबा आत्राम यांना थेट इशारा दिलाय.
माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन; आत्रमांच्या लेकीचा इशारा
मी स्वतः घर सोडून आली आहे, मला घर शोधायचे आहे. मी स्वतः भिंगरी सारखी फिरले. मी आणि बाबा एकच नाही, मी माझा मार्ग वेगळा केला आहे.. बाबा अजूनही राजाप्रमाणे थाटात आहेत, सुधरले नाहीत. आम्हाला कुणी हात धरून शिकविले नाही. मला संधी द्या, सोने करेल. माझ्यासोबत जनता आहे. आता माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. ते शेर आहेत तर मी शेरनी आहे, माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन, असा इशारा देखील भाग्यश्री आत्राम यांनी दिला.
