ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी संच जनजागृती कार्यक्रमाचा 11 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ईव्हीएम प्रात्यक्षिक जनजागृती फिरते वाहन आणि ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती उपक्रमामुळे जनतेला मतदान यंत्र व निवडणूक प्रक्रिया याविषयीची माहिती मिळेल, असा विश्वास शिनगारे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार उज्वला भगत, नायब तहसिलदार स्मितल यादव, प्रदीप कुडाळ, अव्वल कारकून ऋषिकेश कुलकर्णी तसेच निवडणूक शाखेतील व जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
