महापालिका क्षेत्रात १४३९९ श्रीगणेश मूर्तींचे तसेच ११४७ गौरी मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन
ठाणे : श्रीसह गौरी विसर्जनाच्या सहाव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १४३९९ गणेश मूर्ती तसेच ११४७ गौरी मूर्ती अशा एकूण १५५४६ मूर्तींचे सुव्यवस्थित नियोजनात विसर्जन संपन्न झाले. त्यात १०९ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले.
महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलीस व स्वयंसेवकांच्या साथीने विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले.
भाविकांनी २५९ मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या
महापालिकेच्या एकूण १० ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २५९ गणेश मूर्तींचे महापालिकेच्यावतीने स्वीकृती केंद्राच्या जवळच्या कृत्रिम तलावांमध्ये विधिवत विसर्जन करण्यात आले.
१३ टन निर्माल्य भक्तांनी केले दान
सहा दिवसाच्या गणेश मूर्ती व गौरी मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १३ टन निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे १२ टन निर्माल्य संकलन झाले होते.
पाचव्या दिवशी ७०९६ मूर्तींचे झाले विसर्जन
ठाणे महापालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी ७०९६ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, ५८ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचा समावेश होता.
विसर्जनाची आकडेवारी – सहावा दिवस
(विर्सजन स्थळ (संख्या) – मूर्तीची संख्या)
कृत्रिम तलाव (१५) – ७३९०
खाडी विसर्जन घाट (०९) – ५५२९
विशेष टाकी व्यवस्था (४९) – ११४९
फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – ७२
मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – २५९
एकूण – १४३९९
एकूण गणेश मूर्ती – १४३९९
एकूण गौरी मूर्ती – ११४७
सार्वजनिक गणेश मूर्ती – १०९
विर्सजनाची आकडेवारी – पाचवा दिवस
(विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तींची संख्या)
कृत्रिम तलाव (१५) – ३९४८
विसर्जन घाट (०९) – २४८२
विशेष टाकी व्यवस्था (४९) – ५८१
फिरती विसर्जन व्यवस्था (०६) – ००
स्वीकृती केंद्र (१०) – ८५
एकूण – ७०९६
(सार्वजनिक गणेश मूर्ती – ५८)
फिरती विसर्जन व्यवस्था
यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, ‘पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२४’ या शीषर्कावर उपलब्ध उपलब्ध करण्यात आले आहे.
टाकी व्यवस्था ४९ ठिकाणी
गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार, गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे.
१० मूर्ती स्वीकृती केंद्रे
तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.
१५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था
आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाई नगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
०९ ठिकाणी विसर्जन घाट
त्याचबरोबर, कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.
00000
