कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 54 कि.मी. लांबीचे सिमेंट कॉक्रीट रस्ते साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करणे प्रशासनाच्या विचाराधीन होते. याकरीता महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार 15 वा वित्त आयोगा अंतर्गत डस्ट मिटीगेशन या कंपोनंटमधील उपलब्ध निधीमधून GeM पोर्टलवर, ऑनलाईन रोड स्विपींग मशीन खरेदी करण्याची निविदा प्रसिध्द करण्यात आली.
विहीत प्रचलीत निविदा प्रक्रिया पार पाडून मे. कॅम ॲव्हीडा, पुणे या कंपनीला GeM पोर्टलवर सदर रोड स्विपींग मशीन खरेदी कार्यादेश देण्यात आला. त्यानुसार एकूण 4 रोड स्विपींग मशीन्स लवकरच महानगरपालिकेत दाखल होतील. तद्नंतर सदर रोड स्विपींग मशीनचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रितसर नोंदणी होवून, तद्नंतर प्रत्यक्ष रस्ते साफसफाई कामाला सुरवात होईल.
सदर रोड स्विपींग मशीन हे 6.5 घ.मी. क्षमतेचे असून CNG इंधनावर चालणारे आहेत ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल. हे वाहन आधुनिक तंत्रज्ञानाचे असून, वाहनाच्या मागील बाजूला मेन ब्रश व दोन चाकांच्यामध्ये दोन साईड ब्रश असणार आहेत. याशिवाय वाहनाच्या मागील बाजूस सक्शन होज पाईप लावलेला असून, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खाली असणारा कचरा देखील सक्शन होज पाईपव्दारे उचलण्यात येईल. सदर यांत्रिकी वाहनांच्या वापरामुळे रस्त्यांवर उडणा-या धुळीवर नियंत्रण येईल. त्यामुळे नागरीकांना होणारे श्वसनाचे व फुप्फुसांच्या आजारांचे प्रमाण कमी होईल. सदर रोड स्विपींग मशिनवर, प्रती वाहन 01 चालक, 03 कामगार कार्यरत असतील. या मशीनच्या वापराद्वारे प्रामुख्याने रात्रपाळीमध्ये जास्तीत जास्त रस्ते साफसफाईचे काम करण्यात येईल आणि यावर कामाच्या नियंत्रणाकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागामधील मुकादम, स्वच्छता निरीक्षक हि यंत्रणा कार्यरत राहील.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *