पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या

भारतीय पॅरा ऍथलीट्सचा इंडियन ऑइलद्वारा सत्कार

 इंडियन ऑइलच्या पाठिंब्याचे राज्यमंत्र्यांनी केले कौतुक

नवी दिल्ली- इंडियन ऑइलने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्समधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताच्या पॅरा-ॲथलीट्सचा गौरव करण्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह विक्रमी 29 पदके मिळवली. ही पॅरालिम्पिकमधील भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंडियन ऑइलने पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (PCI) सोबत ऑक्टोबर 2023 पासून पॅरा तुकडीला पाठिंबा देऊन भारतीय पॅरा-ॲथलीट्सचे सक्षमीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

हा कार्यक्रम युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, MoPNG चे सचिव पंकज जैन, इंडियन ऑइलचे अध्यक्ष आणि संचालक (विपणन) व्ही सतीश कुमार यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि PCI चे अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा निखिल खडसे यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि म्हणाल्या, “भारताच्या पॅरा ऍथलीट्सनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली असामान्य प्रतिभा दाखवली आहे. तुम्ही भारताच्या शक्ती आणि आत्म्याचे खरे राजदूत आहात. तुमचा संघर्ष, तुमचा जिद्द आणि तुमचा विजय हे पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे धडे आहेत. या खेळाडूंसाठी इंडियन ऑइलचा पाठिंबा प्रशंसनीय आहे आणि भारताच्या क्रीडा उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारीमुळे त्यांना ऊर्जा मिळते.”

MoP&NG चे सचिव पंकज जैन, यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि पॅरा-ॲथलीट्ससाठी मासिक शिष्यवृत्ती, वैद्यकीय विमा आणि स्पोर्ट्स किट्स इंडियन ऑइलतर्फे देण्याचे घोषित केले. ते पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या क्रीडापटूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आमच्या सध्याच्या टॅलीमध्ये आणखी भर घालण्यासाठी तयार आहोत. केवळ पदक विजेत्यांचेच नव्हे तर पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. ”

इंडियन ऑइलचे अध्यक्ष आणि संचालक (मार्केटिंग) व्ही. सतीश कुमार यांनी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले की, “ही ऐतिहासिक कामगिरी आमच्या पॅरा-ॲथलीट्सच्या लवचिकता आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. इंडियनऑईलला या अविश्वसनीय प्रवासात त्यांना पाठिंबा दिल्याचा अभिमान वाटतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास कटिबद्ध आहोत.”

PCI चे अध्यक्ष देवेंद्र झाझारिया म्हणाले, “माझ्या खेळाडूंचा माझ्यावर विश्वास आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या आउटिंगची तयारी करत आहोत. आमच्या ऍथलीट्सना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी इंडियन ऑइलचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *