गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गांधीनगरमध्ये चौथ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेचे उद्घाटन करताना मला विश्वास आहे की येत्या तीन दिवसांत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि राजकारणाच्या भविष्यावर गंभीर चर्चा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या १०० दिवसात सरकारने १२ स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटलं. “भारतातील जनतेने ६० वर्षांनंतर सलग तिसऱ्यांदा सरकारला सत्तेत येण्याची संधी दिली. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामागे भारताच्या मोठ्या आकांक्षा आहेत. आज १४० कोटी भारतीयांना खात्री आहे की, गेल्या १० वर्षात त्यांच्या आकांक्षांना जे पंख फुटले आहेत, त्याद्वारे तिसऱ्या कार्यकाळात नवीन उड्डाण घेता येणार आहे. असेही मोदी म्हणाले.
“गेल्या १०० दिवसांत आम्ही भारतात १२ नवीन आठ हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आम्ही १५ हून अधिक नवीन मेड इन इंडिया सेमी–हायस्पीड वंदे भारत ट्रेन लॉन्च केल्या आहेत. संशोधनाला चालना देण्यासाठी आम्ही एक ट्रिलियनचा संशोधन निधी तयार केला आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. जैव उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही मोदी म्हणाले.
