सार्वजनिक उत्सव मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आज अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत  तरुणाईशी निगडित  विषयांवर विविध समूह आपली कला सादर करतील. यावेळी ठाणेकरांना ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्याचा आनंद घेता येईल. सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून विसर्जन मिरवणूक सुरू होईल.  धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन  वर्तकनगरपर्यंत ही मिरवणूक निघेल. विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेल. शिवाय ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू यात सहभागी होतील, त्यांनी श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला होता. शिवाय नवी दिल्लीत   प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होतील.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये  ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे  प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू,  प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित राहतील.

या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक,  मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूह सहभाग घेतील.

या आगळ्यावेगळ्या अशा ‘ब्रो ठाणे बदलतंय’ विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *