खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ स्पर्धेअंतर्घत बारामती येथे रोड सायकल स्पर्धेचे आयोजन
पुणे : क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. बारामती येथे या स्पर्धा २० ते २१ सप्टेंबर दरम्यान होतील सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने आयोजित केलेल्या या स्पर्धा बारामती येथे संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होणार आहेत.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संघटन सचिव सचिव प्रताप जाधव, यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींच्या क्रीडा गुणांना वाव देणे, स्पर्धांचा सराव होणे आणि त्यामधून गुणवान महिला खळाडूंची निवड करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रथम विभागीय स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सायकलिंग खेळाच्या ‘वुमेन्स लीग’ स्पर्धा रोड आणि ट्रॅक प्रकारात होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार विभागात या स्पर्धा होतील.
पश्चिम विभागाची रोड प्रकारामधील दुसरी स्पर्धा बारामती येथे पाटस ते लिमटेक गावादरम्यान नवीन तयार होत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार २० सप्टेंबर सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २१ सप्टेंबरला सकाळी १०:०० वाजता खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्पर्धेठिकाणी होणार आहे.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेच्या तांत्रिक संचालिका आणि राष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांनी सांगितले की या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर अशा वयोगटात होतील. स्पर्धा टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारात होतील. तसेच सर्व वयोगटात विदेशी किंवा भारतीय बनावटील वापरता येतील. स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण १ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येतील. याप्रसंगी शिवछत्रपती पारोतोषिक सन्मानीत आणि स्पर्धेच्या मुख्य पंच मिनाक्षी शिंदे, मिलींद झोडगे, बिरु भोजने आदी मान्यवर हजर होते.
