एआयएमआयएमच्या गृहमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर एनआरआय पोलिसांनी घेतली दखल
नवी मुंबई :
एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत असल्याच्या तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह उलवे सेक्टर १९ मधील गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उलवे येथे गणेशोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण केले. यामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक समाजाला अपमानित करणारे भाषण करून मुस्लिम समाजाला हिरवा साप अशी उपमा देवून त्यांना ठेवण्याची भाषा केली. यावेळी दिनांक १५ सप्टेंबर रोजी एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी तथा विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तसेच नितेश राणे यांना मुरुड येथे जाण्यासाठी परवागणी नाकारण्याची विनंती केली असता तत्काळ याची अंमलबजावणी करण्यात येवून तशा सूचना गृहमंत्री कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी उलवे येथील घटनेच्या विरोधात नितेश राणे आणि आयोजक यांच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ धार्मिक भावना भडकविणे, ३५१ (२) गुन्हेगारी धमकी, ३५२ अशांतता पसरवून विशिष्ट समाजाला अपमानित करणे या कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
