मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी (ता. १८) खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. १९) बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घेत पालिका प्रशासनाने ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सोमवारी (ता. १६) पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी बुधवारी (ता. १८) सुट्टी जाहीर केली आहे. महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. या ठरावानुसार भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *