ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय व कोपरापासून खालील कृत्रिम हाताचे वाटप शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर रविवार १३ ऑक्टोबर रोजी होईल. यावेळी ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांच्या पायाची व हाताची मोजमापे घेतली जातील व रविवार, २७ ऑक्टोबर रोजी कृत्रिम पायाचे तसेच हाताचे फिटमेंट तज्ञाकडून केले जाईल.सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती मंदिर शाळेच्या प्रागणांत सकाळी १० ते १.३० वाजेपर्यंत दरम्यान घेण्यात येणार आहे.

कृत्रिम पायाचे मोजमाप व कृत्रिम पायाचे व हाताचे फिटमेंट हे पूर्णपणे मोफत असणार असून लाभार्थिनी शाळेत येण्याचा व परत जाण्याचा खर्च स्वतः करावयाचा आहे. गरजू दिव्यांगांनी या योजनेचा जास्तीत फायदा घ्यावा. तसेच नाव नोंदणीसाठी प्रकल्प प्रमुख देवयानी वेद  (९३२४५४६०११), अमोल नाले (९७६९६०३२३९) ,नामदेव चौधरी (९८१९३२३९४७), नामदेव चौधरी (९८१९३२३९४७),प्रफुल्ल  क्षीरसागर (९१६७४४२४४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *