ठाणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपनी पैकी एक, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने (जेएमएफएस) तिची पहिली शाखा ए/४१०, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू केल्याची घोषणा केली.गतिशील आणि वाढत्या गुंतवणूकदार समुदायासह, ठाणे हे वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ठाणे येथील नवीन शाखेचे उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक आणि गुंतवणूक सल्लागार व वितरण विभागाचे सह-प्रमुख डिंपलकुमार शहा आणि व्यवस्थापकीय संचालक आणि इक्विटी ब्रोकिंग विभागाचे प्रमुख कृष्ण राव यांच्या हस्ते झाले. नवीन शाखा शेअर्स दलाली (इक्विटी ब्रोकिंग), संपत्ती व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन (पीएमएस) याद्वारे विविधांगी गुंतवणूक उपाययोजनांचे संपूर्ण दालन खुले करेल, ज्यामुळे शेअर्स, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, बाँड्स, म्युच्युअल फंड आणि विमा यासारख्या विविध प्रकारच्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूकदारांना प्रवेश शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *