ठाणे : अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” या दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठवा, असे आवाहन या अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले आहे.
अखिल भारतीय बंदर व गोदी उद्योगात जुनी असलेली मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला १०४ वर्ष झाली असून, या युनियनचे ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” हे मुखपत्र आहे. कामगारांना लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून, स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या संकल्पनेतून व ॲड. एस. के. शेट्ये यांच्या संपादकतेखाली गेली २७ वर्ष ” पोर्ट ट्रस्ट कामगार ” हा दिवाळी विशेषांक काढला जातो. या अंकास अनेक मान्यवर संस्थांची पारितोषिके मिळाली असून, यावर्षी देखील पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांक काढला जाणार आहे. या अंकासाठी लेखक व कवी यांनी आपल्या कथा, लेख, कविता, कामगार चळवळ, राजकीय, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, प्रवास वर्णन, चारोळ्या, वात्रटिका या विषयावर आपले साहित्य १५ ऑक्टोबरपर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, कामगार सदन, नवाब टँक रोड, माझगाव, मुंबई ४०००१० या पत्त्यावर किंवा mbptdgeu@gmail.com या ईमेलवर पाठवावे. असे आव्हान अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले आहे.
0000