पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
युवा मोर्चाच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *