मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात बीजेपीच मोठा भाऊ असणार आहे. जागावाटपात बीजेपीच्या वाट्याला १६० जागा येणार आहेत. उर्वरीत जागा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रावादी वाटून घेतील. आगामी विधानसभा निवडणुका १० ते २० नोव्हेंबर दरम्यान, होण्याची शक्यता असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
२८ नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं, अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर किमान एक दिवस गॅप ठेवून मतमोजणी करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे हे लक्षात घेता, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे टप्पे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २३, २४ तारखेला बैठक तर २ ऑक्टोबरनंतर भाजप पहिल्या ५० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
