संजय वाघुले यांच्याकडून सॅटीस पुलाखाली शिबीर
ठाणे : भाजपाचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय संतु वाघुले यांनी आज शुक्रवारी , ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलालगत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कोकणातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सॅटीस प्रकल्पालगत उद्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत शिबीर भरविले आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक जाणीव जोपासून गरजूंना जीवन द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. या शिबिराच्या यशस्विततेसाठी भाजपाचे सर्व माजी नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात आहे.