कल्याण : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप ओंबासे (ठाणे) तर सचिवपदी गफार पठाण (सातारा) यांची एकमताने निवड करण्यात आली. देशातील   शिखर संघटना इंडिया तायक्वांदो च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा  नंदी पॅलेस हॉटेल डोंबिवली येथे संपन्न झाली. या सभेत पंचवार्षिक कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या बैठकीसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने निरीक्षक म्हणून दयानंद कुमार यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून ऍडव्होकेट शुभांगी सोनवले यांनी काम पाहिले. संघटनेचे चेअरमन म्हणून नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते तर कोषाध्यक्ष म्हणून छ.संभाजीनगर चे प्रसाद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
नव-नियुक्त  पदाधिकारी, अध्यक्ष – संदीप ओंबासे (ठाणे),उपाध्यक्ष – तुषार आवटी (पुणे), घनश्याम सानप – (अहमदनगर), महासचिव – अमजदखान (गफार) पठाण (सातारा), सचिव – सुरेश चौधरी (सांगली),कोषाध्यक्ष – डॉ. प्रसाद कुलकर्णी (संभाजीनगर),कार्यकारिणी  सदस्य – नारायण वाघाडे (नागपूर),  पद्माकर कांबळे (कोल्हापूर), प्रमोद दौंडे (सोलापूर).
*प्रतिक्रिया – 1
इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष नामदेव शिरगावकर आणि तायक्वांदो अध्यक्ष अनिल झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात तायक्वांदो या ऑलम्पिक  खेळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि नवीन तंत्र विकसित करून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन  खेळाचा दर्जा उंचावला जाईल व  संघटना सुस्थितीत आणून खेळाडूंना सुख-सुविधा पुरवल्या जातील यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच  स्पर्धा, शिबीरे सेमिनार या मध्ये सर्वांना समाविष्ट करून खेळा मध्ये प्राधान्य देऊ..तसेच राज्यात तायक्वांदो हायटेक करण्यावर आमचा जास्त भर असेल
-संदीप ओंबासे
अध्यक्ष
*प्रतिक्रिया – 2
राज्यातील एकही खेळाडू आम्ही तायक्वांदो पासून वंचित ठेवणार नाही. राज्यातील तळागाळापर्यंत तायक्वांदो पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, गत ८ – ९ वर्ष आम्ही खेळाडूच्या हितासाठी प्रयत्न करत होतो त्याला आता यश मिळाले आहे असे मला वाटते
-अमजदखान (गफार )पठाण महासचिव
*प्रतिक्रिया – 3
राज्यात तायक्वांदोला पुन्हा सुगीचे दिवस येतील.. संदीप सर यांच्या स्वप्नाला आणि प्रयत्नाला यश येत असून आपण नक्कीच ऑलिंपिक पर्यंत मजल मारू…असे काम संघटनेच्या मार्फत आम्ही करू ही खात्री आहे.. खेळाडू – प्रशिक्षक असा कोणताही भेदभाव आम्ही करणार नसून फक्त ऑलिम्पिक हे लक्ष ठेवून आम्ही काम करू. आज महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहत आहे. तायक्वांदो खेळात अनेक आमूलाग्र बदल करण्यात आले. तायक्वांदो स्पर्धा आधुनिक पद्धतीने घेण्यावर आमचा फोकस असेल
डॉ प्रसाद कुलकर्णी कोषाध्यक्ष.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *