बनावट मृत्यु प्रमाणपत्र उघडकीस !
सागर जोंधळे यांच्या तक्रारीवरून गीता खरे, प्रीतम देशमुखांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अनिल ठाणेकर
ठाणे : डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणसम्राट दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी डोंबिवली येथील डॉक्टरचे बनावट पत्र, खोटी स्वाक्षरी, शिक्के मारुन वैद्यकीय उपचाराचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट मृत्यु प्रमाणपत्र उघडकीस आल्यानंतर शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनुसारया प्रकरणात विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्याविरुद्ध विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोंधळे समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणसम्राट दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची कटकारस्थान रचून हत्या करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्या संदर्भात सविस्तर कायदेशीर प्रक्रिया सुरु असून या प्रकरणातील दोषी आरोपींना अटक करण्याची अशी जोंधळे परिवाराने नुकतीच पत्रकार परिषदेत मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी डोंबिवली येथील डॉ.क्टरचे बनावट पत्र, खोटी स्वाक्षरी, शिक्के मारुन वैद्यकीय उपचाराचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट मृत्यु प्रमाणपत्रात विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहेम अशातच ज्या ऑप्टिलाईफ रुग्णालयाचे डॉ.हेमंत इंगोले, यांच्या स्वाक्षरी शिक्क्याचे प्रमाणपत्र शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युपत्रात जोडण्यात आले आहे त्या डॉ.हेमंत इंगोले यांनी आपल्या या प्रमाणपत्राशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. यामुळे विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
