ठाणे : शनिवार आणि रविवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे जागतिक फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे सात हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक एक्टवफिट एक्स्पोचे सीईओ संजय सोलंकी आणि शिवट्रान्स लाॅजिस्टीकचे संचालक शुभम द्विवेदी यांनी दिली.
शरीर सोष्ठव क्षेत्रातील जगभरातील दिग्गजांच्या नावाने “ऑरनाॅल्ड क्लासिक” या नावे हा फिटनेस फेस्टीवल आयोजित करण्यात येत असतो. भारतात प्रथमच हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये मिक्स मार्शल आर्ट, बाॅडी बिल्डींग, पाॅवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, किक बाॅक्सींग, स्ट्राँग मॅन इव्हेंट अशा पद्धतीच्या शारि रीक कौशल्याच्या स्पर्धा पार पडणार आहेत. जगभरातून साधारणपणे दहा हजार लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असून सात हजार लोक प्रत्यक्ष स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहेत. या स्पर्धेत जिंकणाऱ्या भारतीय स्पर्धकांना पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे, अशी माहिती शुभम द्विवेदी यांनी दिली.दरम्यान, या स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताशी सहकार्य करार करणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे, असेही द्विवेदी यांनी सांगितले.
०००००
