पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मा. राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री चौधरी जयंत सिंह, राज्य सरकारचे मंत्री, आमदार व खासदार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते योजनेच्या लाभांचे वितरण
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेतील लाभांचे वितरण करण्यात आले. पहिल्या वर्षात साडेसहा कुटुंबांना या योजनेचा फायदा झाल्याने पंतप्रदान मोदी यांनी सांगितले,
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ‘पीएम विश्वकर्मा योजने’च्या लाभाचे वितरण व योजनेच्या यशोगाथेला समर्पित स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यासमवेत अमरावती येथील ‘पीएम मित्र पार्क’ची (ऑनलाइन) पायाभरणी तसेच राज्य सरकारच्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजने’चा आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजने’चा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सुमारे साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलून त्यांना रोजगार आणि अधिकारिता मिळणार आहे. यापूर्वी बारा बलुतेदारांचा विचार कोणत्याही सरकारने केला नव्हता, मा. पंतप्रधान मोदीजींनी त्यांना प्रशिक्षण आणि वित्तसहाय्य देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे काम केले.
‘मित्र टेक्सटाईल पार्क’मुळे अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचे काम होणार आहे. मा. पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेतून देशभरात निर्माण झालेल्या ७ पार्कपैकी १ पार्क हे आपल्या अमरावतीत होत आहे. या पार्कमुळे येथील ३ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सर्व उद्योगांचे एकत्रीकरण याठिकाणी होणार आहे.
हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस आणि सोयाबीनची खरेदी होईल हा विश्वास यावेळी व्यक्त केला. सर्व समाजघटकांच्या पाठिशी आपले सरकार उभे आहे, ही ग्वाहीदेखील याप्रसंगी दिली.
यावेळी मा. राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री चौधरी जयंत सिंह, राज्य सरकारचे मंत्री, आमदार व खासदार उपस्थित होते.