अनिल ठाणेकर

 

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मिरा भाईंदर येथील स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेताच रुग्णावर डॉक्टरांकडून त्वरीत उपचार करण्यात आले. यावेळी स्वतः सरनाईक रुग्णा सोबत राहून त्यांना धीर दिला. तसेच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना माहिती दिली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *