मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने अध्यात्मरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.

शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ या दिवशी डॉ. सुचेता परांजपे यांचे ऋग्वेदाचा परिचय या विषयावरील व्याख्यान होईल. शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी त्यांचेच उपनिषदे-कथांमधून तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान होईल. महोत्सवाचा समारोप कै. विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित संगीत नाटकातील भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीगीत गंगा हा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी होईल. याची संकल्पना आणि मार्गदर्शन शुभदा दादरकर यांची असून धवल भागवत, श्रीया सोंडूर, संगीता चितळे यांचा यात सहभाग असेल. त्यांना केदार भागवत आणि सुहास चितळे यांची साथसंगत असून निवेदन प्रज्ञा लेले यांचे असेल. अधिकाधिक रसिकांनी या अध्यात्मरंग महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *