अनिल ठाणेकर
ठाणे : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या. वतीने, नुकताच जमीन, पाणी, रोजगार, रेशन, वीज, या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. शहापूर बस स्थानक येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात येऊन धडकला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाचा गेट बंद केला होता. परंतु आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे शेवटी पोलिस अधिकाऱ्यांना गेट खोलावा लागला.
वन जमिनी कसणाऱ्यांच्या १० एकर नावे वनपट्टे मंजूर करून सातबारा तयार करा, पेसा कायद्याप्रमाणे १७ संवर्गात असलेल्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा, शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणांचे पाणी शेतकऱ्यांना पुरवा, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करा. रेशन कार्ड व रेशन संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करा, शेतकरी-शेतमजुरांचे कर्ज सरसकट माफ करा, अजनुप ग्रामपंचायत मधील वनदावे जे पडून आहेत त्याची पूर्तता करून ताबतोब निकाली काढण्यात यावे, अघई व दहिगाव ग्रामपंचायत मधील अंगणवाडी इमारत बांधकाम करा तसेच राजपुरी व शिरोळ ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सुरू करा व अंगणवाडीतील आहाराचा दर्जा सुधारा, बेलनाला ते दहीगाव रस्त्याचे काम चालू करा, दहिगाव ग्रामपंचायत मधील तळवाडा, शिसवली, मनाचाआंबा, तुंबडेपाडा व काहडोल पोही ह्या लाईट देऊन तालुक्यात सर्व खेड्यापाड्यावर लाईटची व्यवस्था करा, धसई ग्रामपंचायत मधिल घरे तोडण्यासाठी फॉरेस्ट खात्याने लावलेल्या नोटीसा तात्काळ रद्द करा, पेसा कायद्याप्रमाणे पेसा गावांना सर्व खेड्यापाड्यात सर्व सुविधांची व्यावसथा करा, शहापुर तालुक्यातील ७२ गावाना लावलेला ग्रीन झोन कायदा रद करा, खर्डी गावातील अखरपडीत जगेंचा घरांसाठी गावठाण द्या, आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व अंघोळी साठी गरम पाण्याची व्यवस्था करा, आवाळे ग्रामपंचायत मध्ये ५% पेसा निधी व १५ वा वित्त आयोग निधीमध्ये केलेल्या भ्रष्टाचारांवर लवकरात लवकर कारवाही करा. ह्या मागण्यांना घेऊन पक्षाच्या शिष्टमंडळाने माकप तालुका सचिव भरत वलंबा, किसान सभा तालुका सचिव कृष्णा भावर, एसएफआय जिल्हा आधक्ष भास्कर म्हसे, डीवायएफआय तालुका अधक्ष नितिन काकरा, सीटू तालुका अधक्ष विजय वीशे, जनवादी महिला संघटना तालुका सचिव निकिता काकरा, नंदू खांजोडे, श्याम नीखडा, सोनू वाघ, दिलीप बोंगे यांनी तहसीलदार कासकोले, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, धसई रेंज RFO ठाकूर, पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन लेखी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली. आंदोलनाला माकप जिल्हा सचिव कॉ.किरण गहला, किसान सभा जिल्हा सचिव चंदू धांगडा, तालुका सदस्य आनंद रोज, मनोज काकवा, अशोक विशे, मनीष फोडसे,देवजी पनगा,बंडू खर्डीकर आदींनी उपस्थित राहून संबोधित केले.
