अशोक गायकवाड

रायगड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल व यंत्रनिगराणी कार्यशाळा व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेमधील निर्लेखित झालेले निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक जी.एस.टीधारक भंगार खरेदीदारांनी विहित नमुन्यातील नमुना अर्ज ङिडी.सह २७ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक संस्था, पनवेल एन.के.चौधरी यांनी केले आहे.
सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सदरचे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस. स्क्रॅप, कॉपर स्क्रॅप, अॅल्युमिनियम स्क्रॅप, ट्युबपट्टी स्क्रॅप, कास्टिंग जॉब इत्यादी विविध प्रकारच्या बाबी समाविष्ट आहेत. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफापध्दतीने निविदा सादर करावयाची आहे.
त्यासाठी फक्त जी.एस.टी. (GST) नोंदणी धारक भंगार खरेदीदाराकडुन सिलबंद निविदा मागविण्यात येत असून ज्या खरेदीदाराचे दर कमाल असतील अशा पात्र जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदीकारास भंगार साहित्याची विक्री करण्यात येईल. विक्री करावयाच्या वस्तू संबंधित विभागामध्ये २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पहावयास मिळतील.या कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज प्रति निविदारु. ३००/- (ना परतावा) संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येतील. सदर नमुन्यातील अर्जातील माहिती अचूकपणे निविदेसोबत रु. १०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार मात्र) अनामत रक्कम म्हणून जमा करणे अनिवार्य असेल. सदर रक्कमेचा धनाकर्ष, Registrar, Industrial Training Institute Panvel, Dist- Raigad. यांचे नावाने ङिडी. च्या स्वरुपात करावा. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा व त्यामध्ये फेरबदल करण्याचा पुर्ण अधिकार प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल हे राखून ठेवीत आहेत. सिलबंद निविदा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता समिती सदस्यांमार्फत प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *