सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांची45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
ठाणे : ठाणे शहरातील सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणारी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी 2024 ते 27 अशी त्रिवार्षिक कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांची पुन्हा एकदाअध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार सुरेश शिंदे हे यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद स्विकारले. विठ्ठल घाडगे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत सुधागड तालुकावासियांचे सभागृह उभे राहण्यापर्यंत विठ्ठल घाडगे यांच्याकडेच संस्थेचे अध्यक्षपद असावे, असा सुर आळवला. तर संस्थेच्या सरचिटणीसपदी पुन्हा राजू पातेरे व खजिनदारपदी विजय पवार यांचीच निवड करून त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या सेवाभावी संस्थेची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिर हॉल येथे रविवारी सायंकाळी पार पडली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी दीपप्रज्वलन करून श्री बल्लाळेश्वराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढविला तर उपाध्यक्ष शंकर काळभोर यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार सुरेश शिंदे यांची सभेच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर सरचि यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार सुरेश शिंदे यांची सभेच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर सरचिटणीस राजू पातेरे यांनी 30.09.2023 रोजी पार पडलेल्या वार्षिक सभेचा इतिवृत्त सादर केला. सदर इतिवृत्त सभेच्या अध्यक्षांकडे सादर करून त्यास सर्वांची मंजुरी घेतली. त्यास अजय जाधव यांनी सुचक व हरिश्चंद्र मालुसरे यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे खजिनदार विजय पवार यांनी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 चा आर्थिक वार्षिक जमा खर्चाचे वाचन केले. त्यानंतर जमा-खर्च सभेपुढे मांडला. त्यास राकेश थोरवे सुचक आणि अनिल सागळे यांनी अनुमोदन दिले. त्यास सर्वांनी मंजुरी दिली. सन 2023 – 24 चा कार्य अहवाल दत्ता सागळे यांनी मांडला. दरम्यान संस्थेच्या 204 ते 2027 या तीन वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांची अध्यक्ष्यपदी, राजु पातेरे यांची सरचिटणीसपदी तर विजय पवार यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच संस्थेचे आजीव सभासद नोदणी पुन्हा सुरू करण्याचा ठरावही करण्यात आला. त्यास उपस्थितांनी चर्चा करून मंजुरी दिली. अखेर संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आभार व्यक्त करत संस्थेचे स्वतःचे सभागृह उभे राहिपर्यंत आपण अधिक जोमाने काम करणार असून संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ व सदस्यांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचे मत मांडले.
