नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात कॉम्रेड सिताराम येचूरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार.

मुंबई: भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचूरी यांना यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज महाविकास आघाडीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सिताराम येचुरीयांच्या राजकीय वाटचालीतील अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. विद्यार्थी चळवळीपासून काम करत त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत विविध पदे भूषवली. युपीए सरकारवेळी सर्व पक्षांना एकत्र ठेवण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. सिताराम येचुरी यांच्या निधनाने फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेच नुकसान झालेले नाही तर देशाचे नुकसान झाले आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी खासदार कुमार केतकर, तिस्ता सेटलवाड, तुषार गांधी, माजी आमदार जयंत पाटील, हुसैन दलवाई, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *