अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी हायकोर्टाच्या पोलिसांवर प्रश्नांच्या फैरी
मुंबई : नॉर्मली, एन्काऊंटरला तुम्ही डोक्यात गोळी मारता का? असा थेट सवाल आज न्यायमुर्तींनी सरकारी वकीलांना विचारत बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी प्रश्नांच्या फैरीच झाडल्या… बदलापूर चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू झालीय. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकिलांना गंभीर सवाल केलेत. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय असं हायकोर्टाने म्हटलंय. रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल कोर्टाने केला आहे.
एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. आरोपीसा दुसरीकडे घेऊन जाताना तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणे त्याच्याकडे नव्हती. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? की हातावर किंवा पायावर मारता? त्या गाडीत जे पोलिस अधिकारी होते पूर्णपणे प्रशिक्षीत आणि पारंगत होते. अशा चार व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक अधिकारी ज्याने अनेक एन्काऊंटर यशस्वी केले आहेत, अशा पोलिस अधिकाऱ्यासमोर तो एकटा आरोपी वरचढ ठरून पोलीस अधिकाऱ्यांचे पिस्तूल हिसकावून गोळीबार कसे काय करेल ? असे सवाल हायकोर्टाने केले आहेत. कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की, आमचा पोलिसांच्या कारवाईवर सवाल नाही, परंतु जे सत्य आहे त्या व्हॅनमध्ये जे काही घडले ते समोर येणे अत्यावश्यक आहे त्यासाठी आता अक्षय शिंदेवर जी गोळी झाडली त्या हत्यारांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
न्यायालयातील सवाल जबाब जसाच्या तसा
माझ्या मुलाचॉ पिस्तूल हिसकावण्याची हिंम्मत नाही. मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासासाठी माझ्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. भविष्यात निवडणुक असल्याने मुलावर रोष असल्याने त्याचा राजकाय फायदा घेतला जात आहे, असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्याकडून वकील अमित कटारनवरे यांनी ठाणे पोलिसांनी दिलेली प्रेस नोट वाचून कोर्टासमोर माहिती दिली. अशा प्रकारच्या घटना या कायद्याला अनुसरून नाहीत. भविष्यात पोलीसराज सुरू होण्यास वेळ लागणार नाही. ‘देवा भाऊचा न्याय’, ‘मुख्यमंत्र्यांचा न्याय’ असे संदेश जाऊ लागले तर मग न्यायव्यवस्थेची गरज काय?, हे प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीनं न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.
न्यायालयाचे सरकारी वकीलांना प्रश्न
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – बंदूक कोणती होती?
सरकारी वकिल- 9 MM पिस्तुल होती
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – पिस्तुल होतं की रिवॉलव्हर?, नवं होतं की जुनं? अनुनभवी व्यक्तीसाठी प्रिस्टल चालवणं सोपं नाही.पोलीस अधिकारी युनिफॉर्ममध्ये होते का?, नेमकं काय घडलं? रिव्हॉल्वहर चालवणं सामान्य माणसासाठी एकवेळ शक्य आहे?, पण पिस्तुल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं. सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही?
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – “तुम्ही कधी ते चालवलंय का?”, “मी अंदाजे 500 राऊंड फायर केलेत”. त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहे
राज्य सरकारच्यावतीनं हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली?
वेणेगावकर – या प्रकरणाचा तपास स्टेट सीआयडीकडे दिलेला आहे, त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू झालीय.
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या.
वेणेगावकर – आरोपीच्या पत्नीनं बोईसर इथं दिलेल्या तक्रारीनुसार तिथं गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं.कोर्टाच्या परवानगीनं याप्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती. त्यासाठीच त्याला नेलं जात होतं, त्यादरम्यान आरोपी शांत बसला होता. तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती, अशी माहिती सरकारने दिली. या घटनेनंतर आरोपीसह जखमी पोलीसांना तातडीनं रूग्णालयात नेलं.कळवा येथील शिवाजी रूग्णालय 20 मिनिटांच्या अंतरावर होतं. 23 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7:52 वाजता डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केलं.24 सप्टेंबरच्या 4:56 या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर 8 वाजता बॉडी जेजेत पोस्टमार्टमसाठी पाठवली.त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे.
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – जखमी पोलीसाच्या मांडीतून गोळी आरपार गेली आहे. आरोपीनं अचानक अधिका-याच्या कमरेत खोचलेलं पिस्तुल खेचलं आणि तीन राऊंड फायर केले. त्या गाडीत चार पोलीस अधिकारी होते, जे पूर्णपणे प्रशिक्षित होते. त्यातला एक एन्काऊंटकर केलेला पारंगत अधिकारी होता. यासर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तुल हिसकावू शकतो?, हे समजणं थोडं कठीण जातंय
हायकोर्टाचे न्यायमुर्ती – आमच्या पोलीसांच्या कारवाईवर संशय नाही, पण सत्य समोर येणं गरजेचं.
हायकोर्टाचे न्यायमुर्ती -अक्षय शिंदेवर चालवलेल्या गोळीचा फॉरेंसिक रिपोर्ट सादर करा. गोळी कुठून आणि किती दूरून चालवली गेली? ती आरोपीला कुठे लागली आणि कुठून बाहेर पडली? याचा अहवाल सादर करा.
