नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सभा घेत विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली आहे. एकीकडे गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली असताना आता अमित शाहांनी नवा प्लॅन सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत.  अमित शाह म्हणाले, ’१६ राज्यात आमची सत्ता आहे. तुमचे सगळे मिळून जेवढे जागा आलेत त्यापेक्षा जास्त जागा आमचे आले आहेत. २०२४ मध्ये भाजपाची बहुमताने सत्ता येईल याचा विश्वास आहे. काहीजण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढत असतात. मात्र आम्ही भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो. ३७० जाईल कुणाला वाटत होत का? राम मंदिर होणार असं कुणाला वाटत होतं का?’ असा सवालही शाह यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *