सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंधदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने महालक्षमी हॉल, कुडाळ, जिल्हा सिंधदुर्ग येथे २८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान पालकमंत्री राज्य मानांकन स्पर्धा रंगणार आहे. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होईल. तर महिला एकेरी गटाचे सामने २९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजल्यापासून खेळविण्यात येतील. प्रदीर्घ कालावधीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १४८ तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. पुरुष एकेरी गटात विद्यमान राज्य विजेत्या पुण्याच्या अनिल मुंढेला तर महिला एकेरी गटात विद्यमान राज्य विजेती मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. योगेश परदेशी, प्रशांत मोरे व संदीप दिवे या तीन विश्वविजेत्या सहित महम्मद घुफ्रान, प्रकाश गायकवाड, पंकज पवार, काजल कुमारी, आकांक्षा कदम सारख्या आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी कुडाळ व सिंधुदुर्गातील कॅरम प्रेमींसाठी आहे. शिवाय स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येईल.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) अनिल मुंढे ( पुणे ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे ( पुणे ), ५) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ६) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ), ७) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ८) प्रशांत मोरे ( मुंबई )
महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ), २) मधुरा देवळे ( ठाणे ), ३) दिक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ), ४) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६) पुष्कर्णी भट्टड ( पुणे ), ७) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ८) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग )
