मुंबई: अजित पवारांनी मागितलं असतं तर पक्षाने त्यांना हवं ते दिलं असतं. पक्ष तोडण्याची काय गरज होती? पण त्यांनी आमचं जीवन अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि ते निघून गेले असे शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मी कधीही पक्षात नेतृत्वाची मागणी केलेली नाही. अजित पवार हे मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न काही करत होते. जर त्यांनी मागितलं असतं तर सर्व दिलं असतं. पक्ष हिसकावण्याची गरज नव्हती. मला पक्षाचं नेतृत्व अजित पवारांना देऊन आनंद झाला होता, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अजित पवार किंवा त्यांच्या पक्षातील कोणाशीही या विषयावर खुल्या चर्चेला मी तयार आहे, असे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
