मुंबईतील बॉम्बे रुग्णालयीत उपचार सुरू०प्रकृती स्थिर
मुंबई- महाराष्ट्राचे अन्न, नागरि पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातून एअर लिफ्ट करून मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी पुण्यात आले होते. पावसामुळे मोदींचा हा दौराही रद्द झाला आह.
दरम्यान, मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ यांना ताप आला आणि घशाचा संसर्ग झाला त्यामुळे त्यांना दुपारी पुण्यातून मुंबईत आणण्यात आलं. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं छगन भुजबळ यांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ हे उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत असं सांगण्यात आलं आहे. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
