विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जय श्रीराम चा नारा देत पाडकाम थांबवण्याची दिले आदेश

मुंबई : मस्जिद बंदर वडगादी येथील सॅम्युअल स्ट्रीट मध्ये शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेले श्रीकृष्ण हवेली मंदिर मुळासकट जमीन दोस्त करण्याचा घाट विधानसभा अध्यक्षांनी उधळून लावला आहे. मंदिराची पाहणी करत आणि जयश्री राम चा नारा देत विधानसभा अध्यक्षांनी या मंदिराचे पाडकाम थांबवण्याचे आदेश उपस्थित महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना दिले आहेत.मांडवी संघर्ष समितीने दिलेल्या जाहिर निवेदनाला मान देत नार्वेकरानी ह्या परिसराला भेट दिली होती.

याविषयी एडवोकेट राहुल नार्वेकर यांच्यासोबत संबंधित खात्यांची अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे एका झुलाछाप बिल्डरने महानगरपालिका बी विभागाचे अधिकारी आणि ट्रस्टींना हाताशी धरून या मंदिराच्या जागी उंच इमारत बांधून बक्कळ पैसा कमावण्याचा घाट घातला होता. मंदिराची इमारत धोकादायक दाखवण्यासाठी टॅग कमिटीला अहवाल पाठवून मनपा बी विभाग अधिकाऱ्यांनी श्रीकृष्ण हवेली मंदिराची इमारत सी १ कॅटेगरीमध्ये सामील करून धोकादायक घोषित केल्याचा आरोप मांडवी संघर्ष समितीने जाहिर निवेदनात केला आहे.

मंदिर पाडताना वाद विवाद उफळून  येतील या भीतीने ट्रस्टींनी हायकोर्टात धाव घेत मंदिर जमीनदोस्त करण्याची परवानगी आणली होती. या परिसरातील हे प्रसिद्ध मंदिर असल्याने मंदिराला हात लावण्यास विकासाक देखील घाबरत होता. ट्रस्टने मंदिराची इमारत पाडण्यासाठी एका मुस्लिम कंत्राटदाराची नेमणूक केली होती त्याने तोडकाम करताना मंदिरातला देवीदेवतांच्या मुर्त्याना देखील इजा पोहचवल्यामुळे  हिंदूनच्या भावना मोठ्या प्रमाणात  दुखावल्याची माहिती मांडवी संघर्ष समितीचे पदाधिकारी संपत शेट्टी यांनी दिली आहे.

मांडवी संघर्ष समितीच्या मागण्या

1) पालिकेच्या कायदा विभागाने, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने पारित केलेल्या पाडकाम आदेश विरोधात ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी करावी. हिंदू धर्मात मंदिर न पडता त्याचा जीर्णोद्धार केला जातो हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याची मागणी समितीने केली आहे.

२) पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या मंदिराचे पाडकाम करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश मंदिराच्या विश्वस्तांना देण्यात यावे.

३) मंदिराचे नुकसान करुन विभागीय हिंदु जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याबददल या मदिराच्या विद्यमान विश्वस्तांवर आणि पाडकाम कत्राटदार  मदिरास नूकसान पोहोचवणाऱ्या  जबाबदार सर्व व्यक्तिवर भारतीय न्याय सहिता कलम 206 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील नमूद केले आहे.

४) हा विषय राज्य सरकारच्या मंत्रिमडळ वैठकित मांडून ह्या मंदिराच्या सर्व कामचुकार आणि अकार्यक्षम विश्वसतांची नेमणूक रद्द करावी आणि स्वत पुढाकार घेऊन या मंदिराच्या दैदिप्यमान जीर्णोद्धारासाठी नविन विश्वस्तांधी नेमणूक करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *