अशोक गायकवाड
पालघर:पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी जनता दरबारामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नागरिकांना केले आहे.
सोमवार ३० सप्टेंबरला दुपारी १२:३० वाजता अपर जिल्हाधिकारी यांचे दालन क्र. १०९, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
