युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली
अनिल ठाणेकर
ठाणे : राज्य सरकारने केलेली विकास कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना महाविजय संवाद दौऱ्या’चे आयोजन २८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सोशल मीडिया राज्यप्रमपुख राहुल कनाल, महिला आघाडी संघटना अध्यक्षा मीना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
युवासेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून सुरुवात होत आहे. दररोज सहा विधानसभांला भेट देणार आहोत. पहिला टप्पात मुंबईतील विधानसभांना भेट देणार आहोत. यामध्ये बैठका,मेळावे आणि शाखाभेट आदींचा समावेश असणार आहे, सदर दौरा तीन टप्प्यात होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई, मुंबई उपनगरमधील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे तर १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यांतर्गंत युवकांशी संवाद साधून युवा संघटन मजबूत करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती सर्व कामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या वतीने मीना कांबळी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दौरे करण्यात येतील. लाडकी बहीण संपर्क अभियान दरम्यान गाठीभेटी, मेळावे, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,अन्नपूर्णा योजना याचा आढावा घेण्यात येईल. सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया, वॉररुम आदींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली.
०००००
