भारत विकास परिषदेच्या प्रांतीय समुहगान स्पर्धा संपन्न
पुणे : भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय समुहगान स्पर्धेत पुण्यातील एसपीएम इंग्रजी माध्यम शाळेने पहिला क्रमांक पटकावला असून या शाळेचा विजयी संघ आता भारत विकास परिषदेतर्फे होणाऱ्या समुहगान स्पर्धेत पुढच्या क्षेत्रीय फेरीसाठी बडोद्याला जाईल.
स्पर्धेचे उद्घाटन करताना विख्यात उद्योजक उमेश राठी म्हणाले की समूहगान घेण्याचा उद्देष हा विद्यार्थ्यांयंमध्ये संघ भावना (टीम स्पिरिट) निर्माण करणे हा असून संस्कारक्षम वयात देशभक्ती रुजवणे हाही एक हेतू यातून साध्य होत असल्याने या स्पर्धेचे महत्व निराळेच आहे. प्रमुख पाहुणे दत्ताजी चितळे या वेळी म्हणाले की या स्पर्धांचा इतिहास हा लक्षणीय असून पुण्यातून निवडून गेलेले संघ क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरही चमकल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन्ही पाहुण्यांनी सर्व संघांना भरूपर शुभेच्छा दिल्या.
भारत विकास परिषद दरवर्षी संस्कृत व हिंदी भाषेतील देशभक्तीपर समुहगीत गायनाच्या स्पर्धा भरवते. विविध शाखांतर्फे राज्याच्या सर्व भागात होणाऱ्या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत विजयी झालेले संघ प्रांतीय स्तरावरील स्पर्धेत दाखल झाले होते. एकूण बारा संघांनी यात सहभाग नोंदवला होता.
कर्वे शिक्षण संस्थेच्या सभागृहात या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय स्पर्धा पार पडल्या. भारत विकास परिषदेच्या कोथरूड शाखेने स्पर्धेचे यजमानपद सांभाळले. या स्पर्धेत नासिक येथील विस्डम हाय इंटरनॅशनल शाळेने दुसरा तर पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.
भारत विकास परिषद संपर्क, सहयोग, सेवा, संस्कार आणि समर्पण या पंचसूत्री वर काम करते. यात संस्कार या सुत्रला अनुसरून शाळांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने राष्ट्रभक्ती पर सामुहगान, भारत को जानो (प्रश्नमंजुषा) आणि गुरू वंदन छात्र अभिनंदन असे कार्यक्रम घेतले जातात. संगीत क्षेत्रातील जाणकार सुश्री घुगरी, राजे व साठे यांनी परीक्षक म्हणून कम केले. सुश्री मंजुषा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शाम उकिडवे यांनी आभारप्रदर्शन केले.
0000
