‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज केलेल्या
मुंबई :‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांचे अर्ज पात्र असलेबाबत त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश (SMS) प्राप्त झाले आहेत. परंतू अद्यापपर्यंत योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न (आधारसीडेड) असल्याची त्वरित खात्री करून घ्यावी आणि आधार संलग्न केलेले नसल्यास संबंधित बँकेत जावून बँक खाते आधारकार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही त्वरित करून घ्यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
००००
