अशोक गायकवाड

 

अलिबाग : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ व २ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार १ ऑक्टोंबर रोजी ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड तसेच पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.
१ ऑक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणांची सामुहिक श्रमदानातून स्वच्छता करणे, तसेच नागरिकांना सामुहिक स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी परिसर स्वच्छता स्वच्छता विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. तसेच २ आक्टोंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छ दिवस साजरा करण्यात येईल. त्यानुसार स्वच्छता हि सेवा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, कंपन्या, व्यक्ती तसेच सफाई मित्रांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेमध्ये ओ.डी.एफ प्लस मॉडेल व्हीलेजाचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात येईल. स्वच्छ माझे अंगण अभियान मधील निकषपात्र कुटुंबाना सरपंच व ग्रामसेवक यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार असून, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *