छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होतोय याची खुन्नस काहींना होती, त्यामूळे हे सर्व झाले. आनंद दिघे यांना मोठ्या पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल, अशा लोकांनीच त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण नावानिशी उघड करण्याची ताकत ठवतो. असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
दादर मध्ये एक मेळावा झाला, त्यात गद्दार नेता नव्हता. त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होते. तसेच राज ठाकरे पक्ष सोडून का गेले? कुणामुळे गेले? याची कारण काय? हे सर्व लोक कुणाच्या मुळे गेले? हे सामोर आलेले नाही. त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खूण केला, असा माझा आरोप असल्याचेही संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आज पण हि लोकं त्याचं वेळीचे राजकारण करत आहेत. इथे मोठं होणारा नको, अमच्या सारखं चालणारा हवा. अश्या भूमिकेतील ती लोक आहेत. त्या लोकांमुळेच राणे साहेब, भुजबळ साहेब, राज साहेबांनी पक्ष सोडला. ती गेलेली लोक शिवसेना प्रमुख यांच्या विरोधात नव्हती, तर ती यांच्या मुळे गेली. शिंदे साहेबांना नक्षल्यांच्या नावाने धमक्या का येतं होत्या? तर एवढ्या धमक्या येऊन त्यांना सुरक्षा का नव्हती? असे असतांनाही शिंदे साहेब खंबीर होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे त्यांना शहीद करण्याचा विचार होता, असा घाणाघाती आरोप संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केला आहे.
संजय राऊत यांनी महापुरुषांच्या पुतळ्याच काय होईल, याचा विचार त्यांनी करु नये. त्यांनी फक्त मातोश्री अदानीकडे देऊ नये, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय.
