पुणे: बहुप्रतिक्षित स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत लोकापर्ण करण्यात आले. यावेळी कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले.
मोदी म्हणाले, जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. म्हणून आम्ही महिलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळेया प्रकारे प्रयत्न करत आहोत. विकासाबरोबर वारसाही जपणायचा आमचा प्रयत्न असल्याने सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज केले आहे. पुण्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे. आता सुरु झालेला पुण्याचा विकास खूप आधी होणं अपेक्षित होत पण तस झालं नाही. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्याची फाईल तयार झाली तरी धूळखात पडून होती. २००८ साली मेट्रोची चर्चा सुरु झाली. पण आमच्या सरकारच्या काळात मेट्रो प्रत्यक्षपणे धावण्यास सुरुवात झाली. जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत. आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगलं काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या मेट्रोतून प्रवास केला. आजपासून ही भूमिगत मेट्रो नागरिकांना सुरु केली आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.
