मुंबई : महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सन्मान निधी देण्यात आला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण २९ सप्टेंबर रोजी केलं जाईल असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचं वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा झाले आहेत. पैशांच्या वितरणाची प्रक्रिया चालू झाली असून काहीच वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

आदिती तटकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहेया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *